शेवटी तो मंगल दिन उजाडला ज्याची पिढ़या न पिढ्या तमाम जनतेने वाट पाहिली होती, गेला महिनाभर सोहळ्याची लगबग गडावर सुरु होती, आपला राजा छत्रपती होणार होता. महादरवाजापासून ते भवानी टोकापर्यंत संपूर्ण गड़ गुढ़या तोरणानी सजला होता. गेल्या कित्येक वर्ष खंबीर उभ्या असणाऱ्या रायगडाच्या काळजात उगाच गलबलून आलेल, कित्येक वर्षाची त्याची प्रतीक्षा आज संपणार होती, त्याला धनी लाभणार होता, रयतेला 'छत्रपती' लाभणार होते.
गडाचा राबता वाढला होता. महादरवाजा येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याच् स्वागत खुल्या दिलानं करत होता, राजसदर आज नेहमी पेक्षा जास्तच सजली होती, कारण कित्येक वर्षानी तिला धनी लाभला होता.
पहाटे पासूनचे राज्याभिषेकाचे विधी आटपुन गड़देवी आणि ' जगदीश्वराचे' दर्शन घेऊन महाराजसाहेब राजसदरेकड़े चालु लागले. सदरेवर वर्दी आली.....
आस्ते कदम.... आस्ते कदम.... आस्ते कदम.....
महराज.....sssssss
तशी दरबारतला गोंधळ शांत झाला, अष्टप्रधान मंडळ, सरदार, रयत सगळेजण सावरून उभे राहिले आणि तो सुवर्णक्षण आला महाराजसाहेबांनी दरबारात प्रवेश केला, सोबतिला सोयराराणीसाहेब सरकार आणि पुढील भविष्यात ज्याच्या तेजाने सबंध हिन्दुस्थान दिपुन जाणार होता ऐसे मराठ्यांचे पहीले युवराज संभाजी होते.
महाराज साहेब त्या सिंहासनाजवळ गेले त्याची पायरी चढ़ण्याअगोदर त्या चरण स्पर्श करताना आठवणींचा पट डोळ्यासमोरून गेला. स्वराज्याची घेतलेली शपथ, स्वाराज्यात सामील झालेला तोरणा, अफजलखानाची वावटळ, सिद्दी जौहरच्या विळख्यातुन झालेली सुटका, घोड़खिंडीत 'बाजीप्रभु' आणि 'बांदलसेनेने' दाखवलेले शौर्य. हिन्दु असुनही लाचार पण शाही फ़ौजेने बलाढ्य असणाऱ्या मिर्झाराजे जयसिंगाचा अजगरी विळखा, चातुर्याने केलेला 'पुरंदरचा तह', साथीदारांनी जीवाची बाजी लावुन परत मिळविलेले गड़ डोळ्यासमोर आले.
आलमगिराची झालेली भेट, कैदेत केलेला अपमान, आपल्या काळजाच्या तुकड्याला ओलिस ठेवण्याची केलेली युक्ती सारं सार काही डोळ्यासमोरून झरकन निघुन गेलं.
आणि महाराज सिंहासनावर विराजमान झाले दाही दिशांनी पुष्पवृष्टी केली गेली, देवदेवता अष्टदिक्पाल यांनी जयजयकार सुरु झाला......
"महाराज sssssssss
गड़पति,
भूपती
प्रजापती,
सुवर्णरत्नश्रीपती,
अष्टावधानजागृत,
अष्टप्रधानवेष्टित,
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत,
न्यायालंकारमंडीत,
राजनितीधुरंधर,
प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रियकुलावतंस
श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय" !!!!!
संपूर्ण जगाला कळले मराठ्यांना आज धनी मिळाला, आमचा राजा 'छत्रपती' झाला.