व पु

प्रिय वपु,
लौकीकार्थाने तुला या नश्वर दुनियेतुन जाऊन 14 वर्ष झाली. मला खात्री आहे की तू आता जिथे असशील तिथे सुद्धा 'रंग मनाचे' लावून माणूस शोधत असशील. तुला सवयच होती म्हणा ती. वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते काही आठवत नाही, पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळल ते भन्नाटच होत.
"लक्षात ठेव दोस्त,  तुला मी हवा आहे म्हणून मला तु हवा आहेस" अशी दोस्तीची एक नवीनच व्याख्या समोर ठेवून अंतरबाह्य बदलून टाकलस, 'सखी' मधून चतुर्थीचा अर्थ सांगितलास. कधी 'वपुर्झा'तुन खर्चाच गणित समजावलस तर कधी 'पार्टनर' मधून नरक म्हणजे काय याची अनुभूति दिलिस. 'गार्गी'सारख तुला भेटण्याच् भाग्य नव्हतं कदाचित माझ्याकडे पण पुस्तकरूपातुन तुझ्यासारखा 'दोस्त' कायम माझ्यासोबत राहील.

#Gypsy

Labels: , ,