घर थकलेले संन्यासी, हळूहळू भिंतही खचते
आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला आठवते
ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी आभाळ घसरले होते
ग्रेस
बरोबर एक महिन्याआधी पुण्याला परत येत असताना पाहिलेला हा सूर्यास्त. आजवर अनेक ठिकाणाहुन सूर्यास्त पाहिलेत, पण त्यादिवशी जरा वेगळच वातावरण होत. एकीकडे सूर्य अस्ताला जात होता आणि दूसरी कड़े मन सुद्धा एका अनामिक क्षितिजाकडे धाव घेत उगाचच हळव होत.
घर सुटल्याची अनामिक बोच त्याला डाचत होती, सूर्याला सुद्धा असच वाटतं असेल का. कधीतरी विचारुन पहायला हव, बाबारे रोज रोज तुला घर सोडताना हळव नाही होत कारे, की तुला पण सवय झाली आहे एकटेपणाची....
