शनिवार वाड़ा

हाच तो वाङा जिथे शिवछात्रपतींचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हिन्दुस्थानावर स्वार्या करायचे मनसूबे आखले गेले,
मराठेशाहीचा जरीपटका अटकेवर फड़कवत विजय मिळवून परतणार्या खाशा स्वार्यांच स्वागत इथेच केले गेले,
"दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा" या शब्दाला जागण्यासाठी निघालेल्या मोहिमांना याने भरल्या मनाने निरोप दिला.
अजेय पेशवा 'बाजीराव' साहेबांच्या पराक्रमाने हा पुलकित  झाला, 'मस्तानीच्या' नितळ सौंदर्याने घायाळ झाला. एक संपुर्ण पिढी बरबाद करणाऱ्या पानीपताच्या लाजिरवाण्या  पराभवाने खचुन गेला. पराभवानंतर राखेतून परत भरारी घेण्यासाठी गणेश महालात 'श्रीमंत माधवराव पेशव्यांनी' घेतलेल्या अनेक कठोर निर्णयाने शहारून गेला !!!! स्वकियांनीच सत्तेच्या मोहापायी नारायणरावावर घातलेला गारदी असो वा इंग्रजांनी चढ़वलेला 'यूनियन जॅक' अश्या अनेक चांगल्या वाईट घटना आपल्या हृदयात सामावून घेत, वैभवाशाली इतिहासाची गाथा सांगत हा अखंड उभा आहे.

Labels: , ,