Story - 1

     आज तो जरा घाईतच होता,  एक स्टोरी त्याला कव्हर करून उद्यासाठी ब्रेक करायची होती. गेले 45 दिवस तो ही स्टोरी कव्हर करत होता आणि आज त्याचा शेवट होणार आहे , त्यासाठी घरून निघायच्या घाईत असतानाच एक नंबर स्क्रीन वर फ्लॅश झाला, पाहिलं तर ऋतुचा कॉल आला होता.
"अरे कुठेस, किती दिवस भेटला नाहियेस" तिचा आवाज ऐकताच त्याला शेवटची झालेली भेट आठवली, त्याला जाणवून गेल जवळपास वर्ष झालेल हिला भेटुन.  मागच्या वेळेसही बालगंधर्व CCD ला भेटली होती तेव्हा सुद्धा असच स्टोरीच्या मागे पळत होतो आपण त्याला उगाच जाणवून गेलं....
"Hello, अरे आहेस ना मी काय बोलतेय ऐकतो आहेस ना तु"  तो हो म्हणाला
"आज भेट संध्याकाळी डेक्कन ला महत्वाच बोलायच आहे तुझ्याशी".
"काय बोलायचं आहे, आता बोल ना ? "
"नाही रे तसं नाही बोलता येणार मला, तु भेट आज मग सांगते तुला"  ती म्हणाली.
बोलताना तिच्या आवाजात एक प्रकारची काळजी त्याला जाणवुन गेली होती.
तो लगेच म्हणाला,
"ठीक आहे Done संध्याकाळी 7 वाजता  भेटु डेक्कन ला". एवढं बोलून त्याने डिस्कवर ला स्टार्टर मारलं आणि निघाला पण डोक्यात मात्र तिचे विचार उगाच घोळत होते.
ऑफिसला पोचताच समीरचा कल्ला सुरु व्हायचा. तो नेहमीच सगळ्यांशी हसत-खेळत असायचा. आजही त्या प्रमाणेच तो आला होता. PC सुरु करताना रोज रिकाम्या असणाऱ्या क्यूबिकल मधे एक अनोळखी चेहरा दिसला. त्याने ओळख करून घेतली.
"Hi, I am Samir ".
त्याचा आवाज ऐकून पहील्यांदा ती जरा गड़बडलीच पण लगेच सावरून म्हणाली
"Hello, I am मृणाल".
"नविन जॉइनिंग का" ?
उत्तरादाखल ती गोड हसून म्हणाली,
"हो आजचा पहिला दिवस आहे माझा".
"ग्रेट, वेलकम - वेलकम" आणि आलेले ई-मेल चेक करायला सुरवात केली. आजच्या मेल्स मधे काही खास नव्हतंच, मग त्याने रोजच्या बातम्यांवर कॉफी पिता पिता नजर टाकली कॉफीच्या मंद अशा सुगंधाने त्याला जरा तरतरी आली मनात विचार डोकावून गेला "तुम न होती तो क्या होता".
तेवढ्यात त्याला रोजच्या मीटिंगचा रिमाइंडर कॉल त्याचा इंटरकॉमवर आला. 'पुणे टाईम्स' चा  एडिटर राहुल रोजची मीटिंग घ्यायचा. त्यात रोजची स्टोरीलाइन,बजेट, कालच्या स्टोरी बद्दल अशी निरस चर्चा असायची. काहीही झाल तरी सगळ्या पत्रकारांना ती अटेंड करण भाग होत. बोलता बोलता राहुल ने सगळ्यांना नाव घेतल;
"समीर देसाई -द फेमस इनवेस्टीगेटिव जर्नलीस्ट आज काय करताय तुम्ही "?
" राहुल, you know very well
माझी स्टोरी सुरु आहे." मी उत्तरादाखल बोललो.
"ओके, ठीक आहे तु एक काम कर तुझ्या सोबत मृणाल ला घेऊन जा. तिला आपण काम कस करतो समजावून सांग".
"She must know how we work" !!
शेवटच वाक्य इंग्रजीमधे बोलायच्या नेहमीच्या सवयीने तो बोलला.
राहुल ने सगळ्यांची ओळख करुन दिली.
राहुल हे सगळं बोलत असताना, समीर ने थोड़ी खुर्ची मागे सरकवून मृणाल कड़े पाहीलं, मृणालच्या चेहर्यावर अजुनही गोंधळलेले भाव होते.
    मिटिंग झाल्यावर राहुल बाहेर आला, मागोमाग मृणालही आली.
डेस्क आवरताना तो म्हणाला,
"मृणाल, तुझ आवरून झालं की लॉबी मधे ये आणि सोबत एक writing pad आणि पेन घ्यायला विसरु नकोस ".
"बस इतकंच" मृणाल प्रश्नार्थक चेहर्याने म्हणाली.
"हो, आजच्यासाठी एवढं ठीक आहे.
"पण, आम्हाला तर क्लास मधे अस सांगितलं.... "तीच वाक्य अर्धवट तोड़त तो म्हणाला, "Class room never teaches you all things dear".
    F.C. Road वर असलेल्या ट्विन टॉवर्स मधे 20 व्या मजल्यावर टाइम्सच ऑफिस होत त्याच्या लॉबी मधून बघताना समोर दिसणारा पुण्याचा नजारा काही औरच होता. उजवी कडे J.W.marriot ची एकमेव उंच इमारत होती, तर समोर पर्वती वरची अजुनही बहरत असलेली हिरवळ डोळ्यांना सुख देत होती.
"समीर, चलो " !!!! मृणालच्या आवाजाने त्याची समाधी भंग झाली.

Labels: , , , , , , , , ,