(स्थळ विदर्भातलं कोणतही एक खेडं )
सुरेश : "ओ जानराव, आज संध्याकाळी बरुबर 6 ग्रामपंचयात कार्यालयाजवळ येजा नक्की.!!"
जानराव : "काउन बे सुरश्या ग्रामसभा त 15 तारखेलेच झाली, आता काय हाय ?"
सुरेश : "बाप्पा तुमाले मालुम नाइ काय, आज डॉ.दाभोळकरांचा 2 रा स्मृतीदिन हाय ना त्याबद्दल मेणबत्ती मोर्चा हाये कार्यालयासमोर."
जानराव : "त्यानं काय हुइन ?"
सुरेश : "भयाड हायेस का बे तू जान्या, टीवी-गिवि काई बगत असत की नाई
आज पुरया महाराष्ट्रात श्रद्धांजली देणार हायेत् आणि हत्येचा निषेध बी करणार."
"काल टीवी वर चला हवा येऊ दया मदे बी रिंगण नावाच एक नाटक होत त्यात बी श्रद्धांजली देली त्यायले."
जानराव :" नाई बे नाईं पायला काल शेतात गेलतो पर्हाटीले पानी द्यायले."
"बरं आता मले एक सांग सुरश्या यान काय हुनारे. अन गेल्या 2 वर्ष काय झोपा काढू रायले होते का बे."
सुरेश : "म्हणजे तुमाले काय म्हणायचं हाये त्यायच्या हत्येचा निषेध बी करू नै का आमीन."
जानराव : "करा ना बाप्पा तुमाले कोन रोकल अथी, पन त्या अगुदर मले एक सांग गावातुन अंधश्र्द्धा भाईर काडन्यासाठी काय केल बे तुन ?"
"किती भोंदूबाबा चा पर्दाफाश केला ?"
"1 वर्ष तो भगत गावात बशेल हाये त्याले भाइर् काढून दाखवा गावातुन मंग मेनबत्त्या पेटवा."
" तुया घरात तरी कदी मेनबत्ती पेटोली होती काबे तुन, लोडशेडिंग मधे लाईन गेल्यावर ?"
सुरेश : "जौद्या तुमाले नाई समजायच ते गोस्ट".
जानराव : "मले नकोच समजाऊ तू हेंबाड़ थूतराच्या, मी चाल्लो शेतात सोयाबीनची खुरपनी राइली माया, पण ते दाभोळकर जीत कुटीबी आस्तीन ना त्यायले एकदा हा प्रश्न इचारुन बग ???
त्यायले तरी पटते का हे थोतांड" !!!
जिप्सी