'गिरणी' म्हणजे दळण दळण्याचे आधुनिक यंत्र. आजच्या काळात हे जारी नामशेष होत चालले असले तरी, गिरणी आणि तिचा आवाज याचा मानवी मनाशी असणारा संबंध कायम आहेच. नेमका हाच धागा पकडून उमेश कुळकर्णी याने 'गिरणी' ही शॉर्ट फिल्म बनवली आहे ज्यात आई-मुलाच्या नात्याचे भावनिक द्वंद सुरेखपणे मांडले आहे.
ही गोष्ट सुरु होते ती पुण्याच्या एका चाळीत. जिथे समीर आणी त्याची विधवा आई जगण्याची धडपड करत असतात, त्यासाठी घरात येते ती 'गिरणी' . सुरवातीला मजा येणाऱ्या त्या गिरणीच्या आवाजाने त्याच आयुष्यच बदलतं, अव्याहत चालणारा तो आवाज त्याच्या आयुष्याचा कोपरा न कोपरा व्यापतो आणि यातूनच एक बंडखोर तयार होतो.
इथे गिरणीच्या आवाजासोबत प्रभाव पाडतो तो 'मनोज लोबो' चा कॅमेरा. मग तो वाड्यात होणारा प्रवेश असो की शेवटच्या प्रसंगामधे 'चंद्रकांत गोखलेंच्या' मागुन जाणारा कॅमेरा संपुर्णपणे त्या घरात नेउन ठेवतो. आवाजने त्रासलेला समीर जेव्हा 'गिरणी' खिडकीतून बाहेर फ़ेकतो तेव्हा नकळतपणे आपण त्या घराचा भाग होउन हळहळतो, हेच उमेशच्या दिग्दर्शनाचे आणी मनोजच्या कॅमेराचे यश म्हणावे लागेल.
'गिरणी' बघताना आपण नकळत याची तुलना नुकत्याच आलेल्या 'किल्ला' सोबत केल्याशिवाय राहत नाही. दोघांची कथा पार्श्वभूमी वेगळी असली तरी मांडलेली वेदना, घुसमट दोन्ही कड़े सारखीच आहे. कदाचित हे साम्य दोन्ही दिग्दर्शक FTII चे असल्यामुळे असू शकतं
Labels: best shotfilm, child, emotion, ftill umeshkulkarni, girnder life, girni, pune, short film, shortfilm, sound