हायवे : एक सेल्फ़ी आरपार

सेल्फ़ी तसं पहायला गेलो तर रोजच्या जीवनातला अविभाज्य भाग. आपण सेल्फ़ी काढ़ताना जसं स्वतःच भान विसरून आत्ममग्न होउन जातो, नेमका हाच धागा पकडून गिरीश आणि उमेश ची गाडी 'हायवे' वरुन धावते आणि एका सुंदर प्रवासाचे आपण साक्षीदार होतो. मुंबई-पुणे प्रवासात एक्सप्रेस हायवेवर घडणारी ही गोष्ट. अमेरीकेतून आलेला एक NRI अपघतामुळे त्यांना भेटणारे विद्याधर जोशी आणि रेणुका शहाणे हे जोड़प, बायकोला पुण्यात घेउन चाललेला वैतागलेला नवरा, राजकीय शो साठी चाललेली अभिनेत्री, मूकबधिर मुलाला शिवनेरीतून घेउन निघालेले वडील, बदली होउन चाललेलं कुटुंब. यातला प्रत्येक जण आपआपल्या प्रश्नात, स्वःताशीच भांडत गुंतला आहे. आजुबाजुला काय चाललं आहे याची तमा न बाळगता हायवे वरुन प्रवास करतोय. ऐका क्षणी खंडाळ्याच्या घाटात अड़कल्यावर हा स्वतःभोवतीचा हा कोश तुटुन पडतो आणि प्रत्येकाला आपल्या आजुबाजूची जाणीव होते.
'रोड' मूवी ही संकल्पना भारतात अजुन फारशी रुजलेली नाही, महाराष्ट्रात तर नाहीच नाही. त्यामुळे 'हायवे' च्या कॅनव्हास चा वापर करून बनलेला हा मूवी निश्चितच वेगळा प्रयोग ठरतो. 


फोटो नेट साभार 

"माणसं कितीही 'बोचरी', 'काटेरी' असली ना तरीही 'माझं' म्हटलं की आपली होतात" !!!
असं म्हणणारा 'किशोर कदम' उर्फ़ 'सौमित्र' च हे वाक्य आज छोट्या छोट्या कारणावरून तुटत असलेल्या नात्यांच्या या जगात अगदी सार्थक ठरतं. "एखाद्या पावसाळी दुपारी " ही कविता म्हणणारा हाच का तो इतकं जिव ओतून काम केलय त्याने. "घन तमीं शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना,बघ जरा तरी" !! ही कविता म्हणत  खुप दिवसांनी दिसणारी रेणुका शहाणे  अगदी भावुन जाते.
एकूणच काय प्रत्येकाने एकदा तरी नक्की करावा असा हा प्रवास आहे.




Labels: , , , , , , , , , , , , , , , ,