Story -2

ऑफिस मधून खाली येताना त्याने मृणालला कामाची साधारण कल्पना दिली.
तो म्हणाला, "बघ मृणाल आपल्या profession मधे सगळ्यात महत्वाचे आहेत ते म्हणजे सोर्स ज्यातून आपण स्टोरीज मिळवतो. रेग्युलर बाइट्स, किंवा पत्रकार परिषदा काय यांची माहिती आपल्याला ऑफिस देतच, पण या पलीकडे सुद्धा स्वतःची स्टोरी बनवायची म्हणजे 'सोर्स' हा हवाच आणि ....."
" पण हा सोर्स तयार कसा करायचा ?" समीर ला मधात तोड़त मृणालने प्रश्न केला
"वेल for that you have to build contacts.  सोर्स कोणीही असू शकतो, 'पोलिस, तुमचे स्वतःचे 'खबरी' कधी कधी गुन्हेगाराची सुद्धा मदत घ्यावी लागते माहिती काढण्यासाठी."
ते ऐकून मृणाल च्या चेहर्यावर प्रश्नचिन्हांच मोठ्ठ अस जाळ उभं राहील आणि ती म्हणाली "एवढ़ सगळं करावं लागत ?"
डेककन पोलीस चौकीकड़े वळताना हसत तो म्हणाला," हो हे करावच लागत, पण Don't worry दोस्त काळजी नकोस करू मी शिकविन तुला सगळं."  लेट्स स्टार्ट अवर वर्क
   "गुडमॉर्निंग बर्गे सर" वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन बर्गे यांच्या केबिन मधे प्रवेश करताच तो बोलला
आपल्या रोजच्या पेपर वाचनाच्या कामात व्यत्यय न आणता बर्गे म्हणाले, "या देसाई बसा". काय म्हणतो तुमचा 'टाईम्स'
"आज कशी काय चक्कर ?"
"टाइम्स ला काय होतय तो आहे बरा पण
सर एक ओळख करून दयायाची होती, ही मृणाल आजपासुन माझ्यासोबत काम करणार आहे. तेव्हा त्यांनी पेपर मधे गुंतलेली मान बाहर काढुन त्यांनी मृणालची जुजबी ओळख करून घेतली. असच अजुन 2-3 पोलीस स्टेशन मधून बातम्या गोळा केल्या. पुढे 'फरासखान्यातून'बाहेर येता येता एव्हाना दुपारचा 1 वाजला होता, मृणालच्या चेहऱ्यावर भूक लागल्याचे चिन्ह स्पष्ट दिसत होते. तेव्हा त्याच्या लक्षात आलं दोघानीही सकाळपासून काहीही खाल्ल नव्हतं. त्याने गाडी स्टार्ट करून सरळ "वैशाली" ला आणली ऑर्डर देउन ते  निवांत बसले तेवढ्यात त्याच लक्ष समोर 'रानडे च्या गेट कड़े गेल आणि नकळत पणे त्याच मन परत क्लासमधे जाउन बसलं
एक 'म्हैसूर मसाला डोसा', एक 'इडली सांबार वित चटनी' अस म्हणत वेटरने ऑर्डर टेबलवर आदळली  आणि तो लगेच भानावर आला.
खाऊन झाल्यावर दोघांच्याही चेहऱ्यावर तरतरी आली होती.
चला आता मुख्य कामाला सुरवात करू
वैशाली मधून निघुन समीर सरळ पोहचला तो कल्याणीनगर मधे एका सॉफ्टवेयर कंपनीच्या पार्किंग मधे इथे त्याला आज शेवटचा पुरावा भेटणार होता. मागच्या 2 महिन्यात पुण्यात 6 महिलांच्या एकाच पद्धतीने हत्या झाल्या होत्या. पहिल्या 4 हत्यांचा तपास न लागताच त्या तशाच राहिल्या पण शेवटच्या केस मधे पोलिसांनी खड़कीतुन एका 24 वर्षाच्या मुलाला पकड़लं होत. त्याच्या विरुद्ध भक्कम पुरावा पोलिसांना सापडला असल्यामुळे खुनी सापडल्याच्या आनंदात पोलीस मग्न होते.
पण त्याला स्वतःला या हत्या एका वेगळ्याच् अर्थाने केलेल्या वाटत होत्या, नेहमीपेक्षा सराईत व्यक्तिने ते खून केले होते.

Labels: , , , ,