सुन्या सुन्या मैफिलित

त्या शाम बेमेगलांना लाख- लाख धन्यवादच दयावे लागतील ज्यांनी तुझ्यातल्या अभिनेत्रीला ओळखून समोर आणलं. वृत्तनिवेदिका म्हणुन सुरु झालेली तुझी कारकीर्द  उत्तरोत्तर वाढतच गेली. केवळ डोळ्यांनीच सगळं काही सांगणारी तुझी नजर तुझ्या स्वाभावाप्रमाणेच करारी होती   सागर सरहदीच्या 'बाजार' मध्ये हैदराबादच्या नवाबी खानदानात वाढलेली बंडखोर 'नजमा' तू जेवढ़या तमन्यतेने उभी केलीस, तितक्याच ताकदीने जैत रे जैत मधली 'चिंधी' ही साकारलीस. या मधून जी स्मिता दिसली ती वेगळीच होती. तुझा 'उंबरठा' कसा विसरु शकतो मी, 'गगन सदन तेजोमय' म्हणणारी तू आजही जगावेगळीच भासतेस. आज तू असतीस तर 60 वर्षांची झाली असती, पण चित्रपटाच बदलतं रूप तुला मानवल नसतं कदाचित.

Labels: , , , , ,