Ernesto Che Guevara

Moments before killing Guevara was asked by one of the Bolivian soldiers guarding him if he was thinking about his own immortality. "No," he replied, "I'm thinking about the immortality of the revolution."[ A few minutes later, Sergeant Terán entered the hut and immediately ordered the other soldiers out. Alone with Terán, Che Guevara then stood up and spoke to his executioner: "I know you've come to kill me. Shoot. Do it." Terán responded by pointing his M1 Garand semi-automatic rifle at Guevara, but hesitated upon which Guevara angrily spat at Terán which were his last words: "Shoot me, you coward! You are only going to kill a man!


मृत्यु आधीचा 'चे ' कदाचित शेवटचा जिवंत फोटो 


हे  शेवटचे शब्द आहे ज्याचा टी शर्ट  जगात सर्वात जास्त खपला जातो, ज्याच्या फोटोच्या सर्वात जास्त प्रति काढल्या गेल्या आहे अश्या क्युबन  क्रांतिकारी डॉक्टर अर्नेस्टो "चे" गव्हेरा (स्पॅनिशErnesto Che Guevara), ऊर्फ चे गेव्हारा किंवा एल चे किंवा चे याचे. 
     प्रचंड बुद्धिमान che च जन्म १४ जून १९२८ रोजी रोझॅरिओ, अर्जेन्टिना येथे डाव्या विचारसरणीच्या कुटुंबात झाला. घरी सगळे उच्चशिक्षित आणि घरी प्रचंड अशी ग्रंथ संपदा असल्याने आपसूकच che  मधे पण ही आवड त्याच्यामधेही वाढिस लागली, त्याला कवितेत रस आला. तरुण वयात  या वाचनामुळेच त्याच्या जीवनात मार्क्स, लेनिन याच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव पडला. एव्हढेच नाही तर जवाहरलाल नेहरुंचेही साहित्य त्याने वाचले होते, पण ते त्याला जास्त रु चले असे दिसत नाही.
तरुणपणी ब्युनोस आर्यस येथे वैद्यकिय शिक्षण घेतानाच त्याला लॅटिन अमेरिकेतील छोट्या छोट्या देशात असलेल्या अन्याय आणि विषमतेची जाणीव व्हायला लागली आणि इथून सुरु झाला तो जगप्रसिद्ध 'मोटरसायकल डायरीज' चा प्रवास, आपल्या शिक्षणा दरम्यान che अर्जेंटीना चिली, पेरु, इक्वेडर, व्हेनेन्झुएला, कोलंबिया ई देश मिळून  तब्बल १५००० किमी फिरला, या दरम्यान त्याला एकच जाणवले अमेरिकन  भांडवलशाहीच्या  जोरावर राज्य करात असलेल्या जुल्मी सत्ता भयाण दारिद्र्य, भुकेली जनता. शिक्षण संपता संपता त्याने या लोकांसाठी काम करण्याचे ठरवले.  १९५४ मधे  डॉक्टर झाल्यावर, त्याने परत भटकंती  सुरु केली. या वेळेस लॅटिन अमेरिकेतील बोलिव्हिया, कोस्टा रिका, निकारागुआ, होंडुरास, अल साल्व्हदोर या देशात तो फिरला तिथल्या समाज जीवनाची पाहणी केली.
     १९५४-१९५५ दरम्यान क्यूबा मधे काम करतांना  तो 'फिडेल कॅस्ट्रो' च्या सहवासात आला आणि उत्तम वक्ता असल्या कारणाने लौकरच कॅस्ट्रो च्या जवळच्या लोकांपैकी एक बनला. इथे che  चा डॉक्टरी अवतार संपतो आणि Rebel CHE चा जन्म होतो क्यूबा मधे बटिस्टा च्या जुल्मी सत्तेविरुद्ध युद्ध काम करताना 'गमिनिकाव्याचा' भरपुर उपयोग करत, ते युद्ध जिंकले आणि बटिस्टा ची जुल्मी सत्ता उलथवली. पण यामुळे CIA च्या टार्गेट यादीत त्याचा समावेश झाला, त्याच्या जीवन काळात CIA ने त्याला मारायचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण CHE  च नशीब जोरावर असल्याने हे सगळे प्रयत्न फसले.
फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे प्रमुख बनल्यानंतर CHE  ने क्युबाचे नागरिकत्व स्वीकारले, आता क्यूबन झालेला तो 'डॉक्टरी' बरोबर उसाच्या  कारखान्यात कामगारासारखं काम लागला, che  मोठेपणा  कदाचित यातच आहे की तो कधीही सत्तेच्या मोहत न अडकता अगदी सर्वसामान्य माणूस म्हणून कायम वावरला.  १९६५ मध्ये क्यूबा मधे आपले  संपले असे  लक्षात आल्याने फिडेल कॅस्ट्रो एक पत्र लिहुन त्याने क्यूबा सोडण्याची परवानगी मागितली. क्यूबा सोडल्यानंतर त्याने आफ्रिकेतल्या बोल्हीवियात पुन्हा क्रांतिकार्याला सुरवात केलि, ९ ऑगस्ट १९६७ ला CIA  ने ट्रेनिंग दिलेल्या बोल्हीवियन आर्मीने जख्मी अवस्थेत पकडून त्याची हत्या केली. वयाच्या केवळ  ३९ व्या वर्षी लढताना  तो शहीद झाला. 
आज त्याचा फोटो जगात सगळ्यात जास्त वेळा  छापला जातो , त्याचा फोटो असलेले टी शर्ट चा खप आजही उच्चांक गाठतात जातो. याद्वारे आयुष्यभर भांडवलशाही विरुद्ध लढलेल्या CHE ची ते एकप्रकारे विटंबना करतात. असे जारी असले तरी आपल्या मृत्यच्या ४८ वर्षांनंतरही फोटोमधून कित्येक जणांना क्रांतीची प्रेरणा देत मरताना म्हंटलेल स्वतःच च वाक्य खर  केलंय  "You are only going to kill a man"… 

EL CHE VIVE !!!





Labels: , , , , , , , , , , , , , , ,