काळ :
साधारण १९९६ ते २०१२ मधला कुठलाही
वेळ : वस्त्रहरण होण्याची -अर्थात भारताला फ़ॉलोऑन भेटलेला
जगात भारी फलंदाज तंबूत धाडल्यामुळे गोलंदाज आनंदात असतो, तेवढ्यात एक साधरणसा वाटणारा तरुण आपल्या पूर्ण पेहरावात मैदानात प्रवेश करतो आणि त्याला पाहून बॉलर च्या चेहर्यावर
" च्यायला आलं का हे? " असे त्रासिक भाव उमटतात. नंतर सुरु होते ती अभेद्य तटबंदीची उभारणी. मी-मी म्हणणारे सगळे बॉलर दात-ओठ खाऊन निष्प्रभ ठरतात. त्याचं कारणही तसंच असतं म्हणा. खेळपट्टी वर 'THE WALL' नावाची अभेद्य भिंत अगदी निवांतपणे स्कोअरबोर्डकडे ढुंकूनही न पाहता, बॉलरची रग जिरवत असते.
त्याचं नाव राहुल शरद द्रविड!
दिसायला अगदी साधारण चणीचा वाटणारा तो खेळायला आला कि जणू 'मी. डिपेंडंबल' बनतो. त्याच्या खेळात नजाकत इतकी की, त्याचे अगदी साधे फटके सुद्धा अगदी एखाद्या कसलेल्या गायकाच्या गळ्यातून सुरेल तान निघावी इतके परफेक्ट! मग 'कव्हर ड्राईव्ह' आणि 'स्क्वेअर कट' तर विचारूच नका, प्रचंड आकर्षक!
अगदी टुकटुक खेळत, विकेट वाचावत मॅच काढणे याला लीलया जमते. हटन, गावस्कर यासारखी मंडळी जे टेस्ट क्रिकेट खेळली, यांचा हा शेवटचाच पाईक होता बहुधा!
The Hindu मध्ये एका लेखात त्याच्या बद्दल म्हटलं आहे.
Sport is mostly instinctive. But Dravid has turned batting into a game of chess. As he lets a scorcher past him or steps back to work the ball square of the wicket to the fence with balletic grace, he seems to tell the bowler: “Your move, please.”
आपल्या खेळाप्रमाणेच आयुष्यात तितक्याच शांत आणि संयमी असणाऱ्या या राहुल-द वॉल- द्रविड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
-जिप्सी
Labels: batsman, birthday, India, Rahul_dravid