WH QUESTION


स्थळ : रानडे इंस्टीट्यूट कॅन्टीन
वेळ : संध्याकाळ क्लास सुरु व्हायच्या आसपास ची
सोबतीला वाफाळणारा चहा

ती : ए परवा काय झालं क्लास मध्ये, मला सांग ना ???
काही नाही ग मीडिया एथिक्स बद्दल लेक्चर होतं, येवढं काही खास नाही.
डिफेमेशन बद्दल सांगितलं.

(ती एकटक पाहत होती, जसं तिला काही कळलंच नाही )

"तुला समजलं नाही का पुन्हा सांगतो हवं तर. हे पहा डिफेमेशन म्हणजे ...
"समीर,  I LOVE YOU, लग्न करशील माझ्याशी" ????

तिच्या चेहर्याकडे कितीतरी वेळ तो तसाच एकटक पाहत होता. अचानक भानावर येऊन तो म्हणाला
"नक्की नाही सांगू शकणार,
प्राजक्ता, इनफॅक्ट लग्नाचं वचन नाही देऊ शकत मी तुला "!!! "लहानपणापासून पाहिलेलं माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. त्यात तुझी होरपळ कशाला होऊ देऊ" ???

त्यावर त्याचा हात पकडून नजर रोखून ती म्हणाली,
" चालेल मला, एवढंच ना  
तुझ्यासोबत आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक
'WH Question' च उत्तर द्यायला मी तयार आहे.

Labels: , , , , , , , , , , , , ,