काल एक अद्भुत विलक्षण घटनेला १३ वर्षे पूर्ण झाली. २००३ क्या वर्ल्डकप मध्ये अख्तरला तारे दाखवले होते. अजूनही तो दिवस लख्ख पणे आठवतो, भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे घरी पर्वणीच असायची. आजूबाजूचे सगळे मित्र घरी आणि घरातला टि.व्ही अंगणात, त्या दिवशी सुद्धा अगदी असेच झालेलं. टॉस जिंकून पाकिस्तान ने पहिली बॅटिंग घेतली आणि सगळ्यांच्या काळजाचे ठोके चुकले होते कारण सगळ्यांचा अंधविश्वास की पाकिस्तान विरुद्ध पहिले बैटिंग घेतली की आपण जिंकणार. यथावकाश मॅच सुरु झाली पाकिस्तानचे खेळाडू एकवेळ UAE विरूद्ध हारतील पण भारताविरुद्ध मॅच म्हंटली की त्यांच्या अंगात असं काही स्फुरण चढ़ते की बस, भारताला मातीत मिळवायचं या त्वेषाने ते खेळतात यावेळी सुद्धा काही वेगळा माहौल नव्हता.
पाकिस्तान च्या डावाची सुरवात केली खवीस 'सईद अन्वर' ने हा आपल्या लौकिकाला जागतच खेळला त्याने 'देव' स्ट्राईक घेऊन तांडव करण्यासाठी सज्ज होता. पाकिस्तान च्या तोफखान्यामध्ये त्यावेळेस वासिम अक्रम, शोएब अख्तर , वकार युनुस, अब्दुल रझ्झाक सारखे नावाजलेले बॉलर होते, त्यामुळे टेंशन अजुनच वाढलेले.
१०१ रन काढत ५० ओव्हर मध्ये २७३ पर्यन्त पोचवलं. भारताची इनिंग सुरु व्हायच्या आधी सगळ्यांच्या चेहऱ्यावर एवढ टेंशन जसा काही आता १० वी चा निकाल हातात येणार आहे.. कोण आपआपसात आता कोण खेळायला यायला पाहिजे, गांगुली ने कोणती स्ट्रॅटजी वापरली पाहिजे यासारख्या चर्चानी जोर धरला होता. तेवढ्यात कोणीतरी भारताची इनिंग सुरू झाली म्हणून आवाज दिला आम्ही मित्र टीव्ही समोर धावलो समोर पाहिलं तर प्रत्यक्षात क्रिकेटचा
डावखुऱ्या वसीम अक्रम ने पहिलीच ओव्हर घेतली होती पहिला बॉल पुश केल्यावर , दूसरा बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथवर टाकला, पूर्णपणे ऑफ़ स्टम्प वर असलेला तो बॉल सोडून देईल असं वाटत असताना सचिन ने थोडं बॅकफूट वर कवर ड्राईव्ह वर फोर मारला, बॉल आणि अक्रम दोघही थेट बाउंड्री बाहेर, सगळे एकच जल्लोष करायला लागले, जे काही टेंशन होतं ते सचिन नावाच्या देवाने आपल्याकडे घेतलं होतं. वसीम ला झोडपल्यानंतर नंबर होता तो तेव्हा जगातला सर्वात फ़ास्ट बॉलर म्हणून ओळखल्या जाणार्या 'शोएब अख्तर' चा. त्याच्या समोर खेळायला भलेभले बॅट्स्मन घाबरत होते, पण हु केयर्स सचिन समोर असताना काळजी कसली. त्याच्या १५० किमी च्या स्पीड ने आलेल्या बॉल ला सरळ थर्डमॅन वार सिक्स मारला. मी आज पण देवाचे आभार मानतो तो सुवर्णक्षण म्या याची देहि याची डोळा पाहिला. त्यानंतर सचिन जे काही सुसाट झाला होता की बस्स, कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह सगळ्यांचा वापर करत त्याने पाकिस्तानच्या गोलदाजीची अशी विखुरली की शेवट पर्यंत सावृ शक्लि नाही. 75 बल मध्ये ९८ रन काढून सचिन आपले बजावले होते. नंतर उरल्या सुरल्या ना गुंडाळायच काम द्रविड़ आणि युवराज केलं. ४५ ओव्हर मध्ये भारताने ही अविस्मणीय मॅच आरामात जिंकली होती.
गोलंदाजाच्या स्पीडचा वापर करत सचिन ने मारलेला तो सिक्स क्रिकेटच्या सार्वकालीक इतिहासात आजही सर्वोत्तम समजला जातो .डोळ्यांच पारण फेडणारी ती मॅच म्हणजे कोणत्याही सचिन प्रेमीच्या मनात कायमची कोरली गेली आहे, जिची आठवण कधीच पुसली जाणार नाही . मॅन ऑफ़ द मॅच सेरेमनीच्या वेळेस सूत्र संचलन करणारा रॉबर्ट जॅकमन म्हणतो, 'थँक यु सचिन तेंडुलकर'. क्रिकेटला अगदी भरभरुन समृद्ध करणाऱ्या इनिंग्स देणार्या देवाबद्द्ल तमाम क्रिकेटप्रेमींची सुद्धा हिच भावना असणार हे नक्की.