सर चार्ली स्पेंसर चॅप्लीन

     त्याचा रंगभूमीवरचा प्रवेश सुद्धा अचानकच झाला होता, त्याची आई स्टेज वर गात असतांना अचानक तिचा आवाज बसला लोकं आरडाओरडा करत होते म्हणून त्याने गायला सुरवात केली आणि एका हसर्या दुखःची सुरवात झाली ती कायमची, त्या हसर्या दुखःच नाव होत ' सर चार्ली स्पेंसर चॅप्लीन'. त्याच जीवन म्हणजे एक चित्रपटच आहे. ज्या देशाने त्याला डोक्यावर घेतले, त्याच अमेरिकेने त्याला कम्युनिस्ट ठरवून हकालपट्टी केली. जगाला कॉमेडी चे धडे देणारा हा मनुष्य तेवढाच करूण हृदयी होता. त्याच्या प्रत्येक चित्रपटातून ती करुणा दिसते आणि हसता हसता नकळत डोळे पाणावत जातात.
     वयाच्या १९व्या वर्षी चार्ली अमेरिकेत गेला आणि त्यांनी जी अमेरीका आपल्या चित्रपटामधून दाखवली आहे, आजही त्याला तोड नाही. त्याच्या चित्रपटाना यश मिळत गेल आणि लोकप्रियतेचे नवे उच्चांक त्याने गाठले होते. वयाच्या ३०व्या वर्षी तो जगातला सर्वात जास्त चर्चिला जाणारा तरुण होता. चार्लीच्या चित्रपटांपैकी सर्वोकृष्ट ठरवणे तसेच अवघडच पण बेरोजगार ट्रँप ची प्रेम कहाणी सांगणारा 'सिटीलाइट्स' , लहान मुलासोबत च नात हळुवार उलगडणारा 'द किड' , 'हिटलर' ला त्या काळात सगळे जण भ्यायचे पण याने त्याला न घाबरता बिनदिक्कत त्याचीच नक्कल करणारा चित्रपट बनवला आणि अजरामर केला. 'हिटलर' वर त्या काळात एवढी सटायर कॉमेडी असलेला १९४० चा 'द ग्रेट डिक्टेटर' हा अगदि मास्टरपीस म्हणावा लागेल. त्याच्या चित्रपटातली प्रत्येक फ्रेम जशी काही सोन्याची मढवलेली आहे इतकी सुरेख होती.
     प्रचंड मानापमान, दु:ख सहन करून जगाला एव्हढी सुंदर कॉमेडी देणारा ह्या माणसाला अमेरीका मात्र त्या काळी ओळखू शकलेली नाही. त्याच्या राजकीय मतांमुळे त्याला कम्युनिस्ट ठरवून त्याला हद्दपार केलं .१९५२ मध्ये ' लाइमलाईट' च्या प्रिमियर त्याने लंडन ला आयोजित केला होता, तेव्हा त्याचा अमेरीकेचा री-एन्ट्री व्हिसा रद्द केला, त्यानंतर तो स्विझर्लंड ला स्थायिक झाला आणि फक्त एकदाच ऑस्कर स्वीकारायला अमेरीकेत पाउल ठेवले. त्यावेळी त्याने केलेले भाषण आजही ऑस्कर सोहळ्यातले सर्वोत्तम भाषण मानले जाते. माणसाने आयुष्यात एकदा तरी 'चार्ली चॅप्लीन' चे चित्रपट पहावे

अशा या नटाचा आज जन्मदिन, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा महाराजा.  तुझे चित्रपट अनंत काल आम्हाला हसवत-रडवत राहतील.


Labels: , , , , , , , , , , , , , , , ,