सैराट झालं जी

कुसुमाग्रजांनी एका कवितेत लिहिलेलं आहे
                                       प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
                                      मातीमध्ये उगवून सुध्दा  मेघापर्यंत पोहोचलेलं
अगदी हाच धागा पकडून नागराजचा सैराट सुरु होतो, आयुष्यात काही क्षण असे येतात तेव्हा आपल्याला वेडेपणा करावा वाटतो, किंबहुना आपण तो करतोच मग त्यात प्रेमात पडण आलंच, तरणहि आलंच .  गावतल्या पाटलाची DASHING मुलगी आर्ची आणि स्वभावाने थोडा लाजरा-बुजरा असणारा परश्या  हि यांचा फुलणारं प्रेम, हि गोष्ट घरी कळण, मग झालेली दोन जीवांची होणारी असह्य फरफट अशी हि साधीशी लव स्टोरी,.पण सैराटने हीच गोष्ट  एका वेगळ्या पद्धतीने ती मांडली असल्याने तो थोडा इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे.  तसं पाहता चित्रपट पाहताना अनेक चित्रपटांची आठवण येण साहजिकच आहे कारण, अगदी अनादी अनंत काळापासून प्र्रेम आणि समाज यातलं द्वंद सुरु आहे आणि राहणार. 
चित्रपटाचा USP म्हणजे या मध्ये दाखवलेला 'रॉ' नेस अगदी कलाकारांपासून ते थेट करमाळ्यासारख्या ठिकाणचे लोकेशन मुख्य म्हणजे त्यात जाणवणारा मातीचा गंध त्यामुळे चित्रपट भावतो.  अजय-अतुल च संगीत तो क्या कहने, कितीतरी वर्षांनी पडद्याजवळ जाउन नाचणार पब्लीकच सगळं सांगून जात. सिनेमटोग्राफी अफाटच सैराट मध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन वेगवेगळे भाग पहायला मिळतात, पहिल्या भागात भेटणारे प्रेमी जीव तर दुसर्या भागात होणारी होरपळ नागराज ने अत्यंत सुंदर टिपली आहे.  जातीपातीवर थेट भाष्य न करता हि समाजव्यवस्थेला मारलेले टोले जाणवत राहतात, कुठेतरी आपणही त्याचाच एक भाग आपणही होत जातो. यातली फ्रेम न फ्रेम सुर्पब आहे. आर्चीच एकटीच शेतात चालली आहे हे म्हणण, परश्याचा बुजरेपणा असो कि स्पेशली शेवटी पोरगी पळून गेल्यामुळे सत्कार करताना एका भावी आमदाराच हार पकडणार्या कार्यकर्त्यामध्ये रुपांतर होण. एका मुलीचा बंडखोरपणा, बापाची अगतिकता ह्या गोष्टी कॅमेराने अगदी सही सही टिपल्या आहेत. 
आज पुरोगामी म्हटल्या जाणर्या महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी 'ऑनर किलिंग' होतं काहीच बाहेर दिसत, काही तसेच दाबले जातात , प्रत्येकाला आपली जात श्रेष्ठ वाटते. या अतातायी मानसिकतेने कित्येक जीव या पायी जातात, वेगळे होतात. याच मानसिकतेचे परिणाम पुढच्या पिढीवर कसे होतात हे 'सैराट' सुचित करतो. दोन तास पन्नास मिनिटांचा हा चित्रपट थोडा रेंगाळणारा वाटत असला तरी ज्या पद्धतीने याचा शेवट होतो त्या साठी तेवढा वेळ घेण अपेक्षितच आहे.  फर्स्ट हाफला पार पडद्याजवळ जाउन नाचणार पब्लिक, शेवटी बाहेर पडताना अगदी सुन्न होऊन बाहेर पडत. 
प्रेम हि अगदी सार्वत्रिक भावना आहे, अगदी पंचगंगेपासून ते ब्रम्हपुत्रेपर्यंत ती सारखीच आढळते. त्याच बरोबर समाजात असणारी जातीपातीची दरीसुद्धा तेवढीच रुंद आहे, कधी ती बहिष्काराच्या रुपात दिसते तर कधी ऑनर किलिंगच्या रुपात. फर्स्ट हाफला पार पडद्याजवळ जाउन नाचणार पब्लिक, शेवटी बाहेर पडताना अगदी सुन्न होऊन बाहेर पडत. कारण प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे तरी आर्ची न परश्या लपलेला असतो, तो बाहेर निघालेला असतो.  आर्ची अन परश्यामध्ये याच कारणाने आपलं व्यक्त न करू शकलेलं, असफल झालेलं प्रेम शोधत असतो आणि इथेच नागराज जिंकतो .पण  चिमुकल्या पायांनी रक्ताळलेल्या पाऊलवाटांवर सैराट चालणारा तू
तूझ्या प्रेमाला पूर्णत्व लाभणार का हा प्रश्न उरतोच 




Labels: , , , , , , , , , ,