आज संध्याकाळी कन्हैयाची आणी आमची पुण्यातील 'वैशाली' नामक सुप्रसिद्ध उपहारगृहात भेट झाली. त्याचे झालं काय हा बाल किस्ना सभागृहाच नाव सार्थ करून, हळूच वेष बदलून रानडेच्या बाजूला असलेल्या गल्लीत आला आणि आम्ही नेमके तिथे लेमन टि पीत होतो तेवढ्यात एक आवाज आला ....
"अरे ओ भैय्या एक कटींग तो देना"
आता त्याची वाकडी चाल पाहून आमच्या चाणाक्ष नजरेने तो कोण ते आधीच ओळखले. झालं चहा पिला आणी पैसे देण्याची वेळ आली मग काय सुरु झालं ना
"आप लोग ये पैसे मांग कर गरीबो पर अन्याय कर रहे है, हमे यहाँ भी सबसीडी चाहिए"
"अरे हमे चाहिये आझादी"
जास्ती वाद टाळावा म्हणून मग एका कटिंगचे पैसे आम्ही देवून आम्ही आणि बाल कन्हैया 'वैशाली' मध्ये आलो.
आम्हा दोघांमध्ये झालेले हे सुप्रसिद्ध गुप्त संभाषण खास तुमच्या साठी....
आम्ही : लेका भारतभर बोंबलत फिरत असतो, सरकारच्या पैशावर ऐश करून तब्बेत पण सुधारून घेतली....
तुला नेमकी आझादी कशाची पाहिजे ??
ककू : अरे हमे चाहिए आझादी....
- अबे हो, पण कसली आझादी पाहिजे बावा...
ककु : हमे गरीबी से आझादी चाहिए !!
- मग अभ्यास कर कि लेका Phd करतो ना तू, ती संपव मग नोकरी लागेल तुझी गरिबी जाईल कि.
ककु : हो पण मला आझादी हवीये ना मी काम कशाला करू ???
ककु : अरे हमे चाहिए आझादी !!!
(तेवढ्यात काउंटर मागून आवाज आला व्यंकू आधी तो टेबल साफ कर आझादी नंतर माग)
- बरं, तू मराठवाड्याबद्दल बोलला तू तरी गेला आहे का कधी मराठवाड्यात ???
(या वर बालकिसना चे थोबाड 'फट्ट पांढरे वरी पसरले' सारखे झाले होते )
- तू बोलला कि सुविधा लोकांपर्यंत पोचत नाही, पण जो पर्यंत तू हॉस्टेल रिकामं करत नाही तो पर्यंत ती सुविधा दुसरी व्यक्तीला कशी मिळणार ???
ककु- अरे लेके रहेंगे आझादी sssss....
तेवढ्यात 'वैशाली' मधली लाईट गेली आणी पुढे
जाऊ दे हो पुढचं आम्ही सांगू नाई अन तुम्ही ऐकू नई..
Labels: azadi, jnu, kanhaiyakumar, pune, ranade, sedition, vaishali