"The Ninny" अर्थात मूर्ख आणी अशक्त

"The Ninny"
आज मला माझ्या मुलांच्या शिक्षिकेचा यूलिया वसिल्येव्ना चा हिशेब चुकता करायचा होता.
"बसून घे यूलिया वसिल्येव्ना", मी तिला म्हणालो, "तुझा हिशेब चुकता करायचा आहे ना ??? "तर आपलं असं ठरलं होत, की महिन्याचे ३० रूबल तुला पगार म्हणून मिळतील, बरोबर ना"??

"जी नाही चाळीस "

"नाही नाही तिस मध्येच गोष्ट पक्की झाली होती, तसही तू आमच्या इथे दोन महीने तर राहिलिस.
जी दोन महिने आणि पाच दिवस राहिले"
"नाही पूर्ण दोन महीने."
"या दोन महिन्यात ९ नऊ रविवार वजा कर. रविवारी तू फक्त कोल्या ला बागेत फिरवायला घेऊन जायचीस. आणि मधात तीन सुट्ट्या पण तर घेतल्या तू… नऊ, अकरा आणि बाराला. तर बारा रुबल इथेच कमी झाले. कोल्या चार दिवस आजारी होता, त्या दिवसात तू त्याला कुठे शिकवलंस. फक्त वान्यालाच शिकवलसना, आणि मग तीन दिवस तुझी दातदुखी चालली. त्यावेळेस सुद्धा माझ्या ब्बय्कोने तुला सुट्टी दिलेली. बारा आणि सात मिळून झाले एकोणवीस. साथ मधून हे वजा केले तर उरतात… हा, एक्केचाळीस रुबल काय बरोबर ना" ??? 

हे ऐकल्यावर युलिया च्या डोळ्यांत पाणी तरारून आलं… 

"आणि हे पहा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तू एक कप-प्लेट फोडलस, त्यांचे दोन रुबल वजा कर. केवळ तुझ्याच निष्काळजीपणामुळे कोल्याने झाडावर चढताना आपला कोट फाडून घेतला, दहा रुबल त्याचे आणि तुझ लक्ष नव्हत त्यामुळे ती कामवाली बाई वान्या चे बूट घेऊन पळून गेली. तर पाच रुबल त्याचे पण कमी झाले … तुला लक्षात आहे का, दहा जानेवारी ला तू दहा रुबल उधार घेतलेलेस. एक्केचाळीस मधून सत्तावीस रुबल वजा कर. बाकी राहिले - चौदा. "

हे सर्व एकून डबडब्ल्या डोळ्याने युल्या म्हणाली, "एकदा मी तुमच्या बायको कडून तीन रुबल उधार घेतले होते". 
"अच्छा, हे तर मी लिहिलेलेच नव्हते. चौदा मधून ती काढून टाक उरले अकरा रुबल. तर हा घे तुझा पगार. तीन, तीन, तीन… एक आणि एक रुबल. "

"धन्यवाद" !!!, ती हळूच उद्गारली 
"तू धन्यवाद का म्हणालीस" ???
"पैशांसाठी"!

"तुझा धिक्कार असो, तुला दिसत नाही का मी तुला फ़सवलय म्हणून आणि वरतून तू मला धन्यवाद देतेस". 
"अरे मी तर तुझी परीक्षा घेत होतो… मी तुला तुझा पूर्ण पगारच देईन ऐंशी रुबल. हे घे पूर्ण रक्कम". 

ती धन्यवाद म्हणून निघून गेली. मी तिच्याकडे पाहत राहिलो आणि डोक्यात विचार आला, कि जगात ताकदवान बनण किती सोप्प आहे. 

_________________________________________________________________
एन्टोन चेकोव्ह च्या THE NINNY या कथेचे स्वैर भाषांतर 








Labels: , , , , , , , ,