जेव्हा तुम्ही बॉक्सिंग हा शब्द मनात येतो तेव्हा- तेव्हा तुमच्यासमोर सर्वात पहिले नाव येत ते
The undisputed heavyweight champion of the world मुहम्मद अली च. १७ जानेवारी १९४२ ला केंटुकि मधल्या लुइजविल शहरात त्याचा जन्म झाला. त्याचं आधीचं नाव 'कॅशियस क्ले'. १२ वर्षाचा असताना त्याची सायकल चोरीला गेली होती, त्याची तक्रार करण्यासाठी तो मार्टिन नावाच्या एक पोलिस ऑफिसर कडे गेला, तिथे त्याचा आवेश पाहून, मार्टिन ने हि उर्जा बॉक्सिंग मध्ये खर्च करायला सांगितली आणि एक जग्गजेत्याचा प्रवास सुरु झाला. त्याला उर्जेवर आणि चपळतेवर प्रचंड विश्वास होता. त्याचे रिफ्लेकसेस प्रचंड जबरदस्त होते कि समोरच्याल त्याच्यापर्यंत पोचताच यायचं नाही. त्यातूनच त्याची Out -Fighter ची पद्धत विकसित होत गेली आणि तो एक उत्कृष्ट बॉक्सर म्हणून नावारूपाला आला. १९६० मध्ये त्याने रोम ऑलिम्पिक मध्ये केवळ १८ वर्षाचा असताना २०० पेक्षा जास्त फाईट खेळलेल्या पोलंडच्या अनुभवी झिबिग्न्यु पीर्त्रझकोवस्कीला. पहिल्याच प्रयत्नात त्याने सुवर्णपदक जिंकल, जिंकल असं कि सामन्याच्या शेवटी पीर्त्रझकोवस्कीची शोर्ट रक्ताने माखलेली होती. यानंतर क्लेच्या आयुष्याचा महत्वाचा अध्याय सुरु झाला. त्याने हेविवेट बॉक्सर बनायचं ठरवल होत. त्या साठी त्याने आव्हान दिलं ते
तेव्हाच्या World heavyweight champion सॉनी लिस्टनला. क्लेचे लढत जिंकायचे चान्सेस अगदी कमी होते. पण नशिबात काही वेगळेच लिहले होते. पहिल्याच राऊंड तो लिस्टनच्या ठोशां च्या टप्प्या बाहेर होता. तेव्हा क्ले डाव्या-उजव्या हातांच्या होरदार प्रहारांनी त्याला हैराण केलं, पुढे लिस्टनने हि लढतच खेळायला नकार दिला. या लढती नंतरच त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. आणि कॅशियस क्ले चा 'मुहम्मद अली' झाला. या निर्णयावर लोकांनी टिका केली पण, त्याने कुणालाही भिक घातली नाही.
अलीची जगण्याची पद्धत पण बिनधास्त होती, विएत्नाम युद्धात भरती होण्यास त्याने साफ नकार दिला. कारण विचारले तर तो म्हणाला,
"Why should they ask me to put on a uniform and go 10,000 miles from home and drop bombs and bullets on Brown people in Vietnam while so-called Negro people in Louisville are treated like dogs and denied simple human rights? No I’m not going 10,000 miles from home to help murder and burn another poor nation simply to continue the domination of white slave masters of the darker people the world over.". यामुळे त्याचा वर बंदी घातली गेली तब्बल ३ वर्ष तो बॉक्सिंग पासून दूर होता.
पुरागमन करताना त्याची लढत होती जॉर्ज फोरमनशी. हि लढत बॉक्सिंग च्या इतिहासात
"Rumble in the Jungle". म्हणून प्रसिद्ध आहे. फोरमन आणि अली दोघेही तुय्ब्ल पप्रतिस्पर्धी होते. आठव्या फेरीपर्यंत चालेली हि लढत प्रचंड ताकदीच्या दोन योध्यांची अशी होती ज्यात कोणीही हार मानत नव्हत. या लढती मध्ये अलीने "रोप-अ-डोप" चा आसरा घातला. शेवटी याच योजनेचा त्याल फायदा झाला. एका क्षणी अलीच्या डाव्या हाताच्या एका "हुक" नं फोरमनचं डोकं वर उचललं. दुसर्याच क्षणी थोडा हि वेळ न गमावता एक ताकदवान उजवा "पंच" फोरमनला चेहर्यावर बसला आणि सगळ संपलं .... फोरमन पाठीवर पडला. नवा जागतिक विजेता हेवीवेट मुष्टियोद्धा होता "महंमद अली"!!!
निवृत्ती नंतर सुद्धा तो एक सुंदर आयुष्य जगला. जगभरातल्या लोकांसाठी, जात, धर्म, पंथ यांच बंधन ठेवता काम केलं. आपल्या भयानक पंचेस नि समोरच्याला नमोहरम करणारा हा महान खेळाडू तेवढाच सुंदर माणूस म्हणूनही आयुष्य जगला. काल या योद्ध्याची प्राणज्योत मालवली, पण जगभरातल्या बॉक्सिंग प्रेमीना तो कायम आठवत राहील "float like a butterfly, sting like a bee" हे वाक्य सर्वार्थानी जगणारा एक उत्तुंग, विशाल आणि वादळी खेळाडू - महंमद अली !
फोटो सौजन्य : फॉक्स स्पोर्ट्स