रुस्तम: देश भक्तीमध्ये गुंडाळलेलं सूड नाट्य

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या काही गोष्टींनी तत्कालीन समाजाला हादरवून टाकलं होतं, यात कावस मानेकशॉ नानावटी खटल्याचा समावेश होता, २७ एप्रिल १९५९ हे सगळं उलटंपालट झालं होतं, या खटल्याने समाजाच्या निष्टाना मुळापासून हादरवून सोडले होते आणि ज्युरी पद्धत या खटल्यानंतर बंद करण्यात आली त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या इतिहासात या खटल्याला फार महत्व आहे. या सत्यकथेवर आधारित असलेला 'रुस्तम' सुद्धा असाच देश भक्तीमध्ये गुंडाळलेला एक ड्रामा. महायुद्धात नाव कमावलेला नेव्हीचा अधिकारी रुस्तम पावरी आयएनएस म्हैसूर या जहाजावर कमांडर म्हणून तैनात असतो. लंडनहुन निघालेलं हे जहाज काही कारणाने  रूट बदलून दोन आठवडे आधी मुंबईत दाखल होतं, रुस्तम घरी आल्यावर त्याला कळतं कि त्याची पत्नी सिंथिया म्हणजेच इलियाना डिक्रुझ दोन दिवसांपासून घरी आलेली नाही. त्यातच रुस्तमला घरी त्याचा मित्र विक्रम आहुजाने सिंथियाला पाठवलेली प्रेमपत्रं सापडतात आणि सगळं मॅटर होतो ,  तिचा तपास करता करता तो त्याचा मित्र विक्रम आहुजाच्या घरी पोचतो पुढे काय होते ते पडद्यावर पाहणं उचित, कारण इथून खरी स्टोरी सुरु होते.

चित्रपट साधारणपणे दोन भागात विभागला गेला आहे, इंटर्वल च्या आधीचा भाग पूर्णपणे इंटर्वल नंतरची स्टोरी सेटअप करण्यासाठी वापरला आहे. एका खुन करणाऱ्या माणसाला मिळणारी सहानुभूती. त्या लेव्हल वर चित्रपट जे वेगवेगळे पदर उलगडतो ते अधिक मनोरंजन करणारे ठरतात. एका  पॉईंट नंतर आपल्याला पुढे काय घडेल हे समजून गेलेलं असते तरीही आपण त्यातले ट्विस्ट आणि टर्न्स पाहण्यासाठी थांबतो.
अक्षय कुमारने एक नेव्ही ऑफिसर च्या मर्यादेत राहून रुस्तम पावरीच्या भूमिकेला वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवलं आहे त्याचा संयत अभिनय, संवादफेक हा रुस्तम चा युसपी ठरतो. इलियाना डिक्रुझ च्या अभिनयाला जास्त वाव नसला तरी ती वॉव अशी बेब दिसते.  अक्षय कुमार बरोबर अजून दोनजणांच्या अभिनयाची इथे तारीफ केली पाहिजे ती म्हणजे पवन मल्होत्रा ने साकारलेला व्हिन्सेंट लोबो आणि कुमुद मिश्राने साकारलेला पेपर मिल मालक खासच . या दोघांच्याही बहारदार अभिनयाने रुस्तमला चार चांद लागले आहेत.  यात अजूनही जुने अभिनेते आहे जे खूप दिवसांनी मोठ्या पडद्यावर दिसलेत.
यात एक त्रुटी आहे ती म्हणजे विनोदाने थिल्लर केलेला कोर्टरूम सिन्स. तुम्ही जर या आधी 12 angry men अथवा Few Good Men. यांसारखे उत्तम कोर्टरूम ड्रामा पाहिले असतील तर त्यांना रुस्तम थोडा कंटाळवाणा वाटू शकतो .

का पाहावा : अक्षय कुमारच्या अभिनय, चित्रपटातले अनपेक्षित टर्न्स आणि ट्विस्ट साठी. गोड गोड दिसणाऱ्या इलियाना साठी. कुमुद मिश्रा आणि पवन मल्होत्राच्या अभिनयासाठी.

का पाहू नये  : सचिन खेडेकर आणि न्यायाधीश यांच्यातल्या फुटकळ विनोदासाठी. 

Labels: , , , , , , , ,