मंटो च्या लघुकथा २ : कम्युनिजम

कम्युनिजम
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
_________________________________________________

तो आपल्या घरातलं सगळं गरजेचं सामान एक ट्रक मध्ये भरून दुसऱ्या शहरात निघाला होता.
तेवढ्यात रस्त्यामध्ये त्याला लोकांनी अडवलं.
एक जण ट्रक मधल्या सामानावर नजर टाकत म्हणाला, " पहा, एवढा मोठा माल एकटाच उडवून  चालला आहे. " 

सामानाच्या मालकाने उत्तर दिलं," साहेब, हे सामान माझंच आहे."

दोन तीन जण हसून म्हणाले, " आम्हाला सगळं माहीत आहे."

मग एक जण ओरडून म्हणाला, " लुटा रे,  हा श्रीमंत माणूस आहे. ट्रक घेवून चोर्या करतो."


Labels: , , , , , , , , , , , ,