रंजीश हि सही



तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा.

जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते.


अशाच या उर्दू भाषेचे अहमद फराज हे प्रतिभावान शायर होते. त्यांची गझल जेवढी पाकिस्तानी होती तेवढीच भारतीय सुद्धा. त्यांची लिखाणाची भाषा अत्यंत साधी असली तरी त्यांनी हुकूमशाहा आणि हुकूमशाहीला नेहमी विरोध केला होता. त्याकाळी जनरल झियाना विरोध केल्यामुळे त्यांना नोकरी तर गमवावी लागलीच पण काही काळासाठी निर्वासित सुद्धा व्हाव लागलं होतं.


रंजीश हि सही हि फराज साहेबांची अत्यंत सुप्रसिद्ध रचना. अनेकांनी हि गझल गायली आहे पण, 'मेहंदी हसन' साहेबांच्या आवाजात ऐकणे म्हणजे सुभानल्लाह.... एकदम स्वर्गीय अनुभव असतो.

खुद्द फराज या बद्दल म्हणाले होते, "मेहदी साहब ने इस ग़ज़ल को इतनी अच्छी तरह गाया है कि यह उनकी ही ग़ज़ल हो चुकी है.." रंजीश, त्यांनी एक मुलीसाठी लिहिली होती, पण जिच्यासाठी लिहिली होती तिच्याशी फराज यांची नंतर भेट झाली नाही.


नव्वदच्या दशकात ते दिल्लीत आले असतांना टाईम्स ऑफ इंडिया ने त्यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांना प्रश्न विचारला गेला, 'शायरी स्वतः अनुभवल्याशिवाय लिहिली जाऊ शकते का' ???

तेव्हा फराज म्हणाले, "नही, सच्ची शायरी तभी निकलती है जब दिल कि हदो से कोई बात महसूस कि जा सके" !!!


पण अहमद फराज जास्त प्रसिद्ध होते ते त्यांच्या सोप्या आणि सुटसुटीत शेरांसाठी...

जसे


उसने मुझे छोड़ दिया तो क्या हुआ फ़राज़,

मैंने भी तो छोड़ा था सारा ज़माना उसके लिए


उम्मीद वो रखे न किसी और से फ़राज़

हर शख्स मुहब्बत नहीं करता उसे कहना


अब तिरा ज़िक्र भी शायद ही ग़ज़ल में आए

और से और हुए दर्द के उनवाँ जानाँ


अब ज़मीं पर कोई गौतम न मोहम्मद न मसीह

आसमानों से नए लोग उतारे जाएँ


दोस्ती अपनी भी असर रखती है फ़राज़

बहुत याद आएँगे ज़रा भूल कर तो देखो


आज अहमद फराज साहेबांची पुण्यतिथी त्यांना विनम्र श्रद्धांजली.

Labels: , , , , , , , , , , , , ,