मंटो च्या लघुकथा ३ : बेखबरी का फायदा

बेखबरी का फायदा

मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
-------------------------------------------------------------------------------------------
खटका दबला : बंदुकीतून गोळी बाहेर पडली. 
खिडकीतून बाहेर पाहणारा माणूस जागेवरच आडवा झाला. 
थोड्या वेळाने खटका पुन्हा दबला :  बंदुकीतून दुसरी गोळी बाहेर पडली.
तो रस्त्यावर पडला, आणि त्याचं रक्त रस्त्यावर वहायला लागलं.
तिसऱ्यांदा खटका दबला. नेम चुकला, गोळी एका ओल्या भिंतीत मिसळून गेली.
चौथी गोळी एका म्हाताऱ्या स्त्रीच्या पाठीत लागली, ती ओरडू सुद्धा शकली नाही आणि तिथेच मरून पडली.
पाचवी आणि  सहावी गोळी बेकार गेली, कोणी मेलं नाही आणि जखमी सुद्धा.
गोळ्या चालवणारा गोंधळून गेला.
मोकळ्या रस्त्यावर एक लहान मुलगा धावतांना दिसला.
गोळ्या चालवणार्याने बंदुकीच तोंड त्याच्याकडे वळवलं.
त्याच्या साथीदार म्हणाला, " हे काय करतो आहे ?"
गोळी चालवण्यार्याने विचारलं " का ?"
"बंदुकीच्या गोळ्या तर संपलेल्या आहेत !"
"तू चूप रहा... एवढयाश्या मुलाला काय माहित पडणार?"





Labels: , , , , , ,