दिशा : फ्रान्झ काफ्का

दिशा  : मूळ कथा फ्रान्झ काफ्का

अगदी छोटीशी असलेली गोष्ट काफ्का ने १९१७ ते १९२३ दरम्यान लिहिली गेल्याचं मानलं जातं, पण  काफ्का जिवंत असतांना हि प्रकाशित होऊ शकली नाही. काफ्काच्या मृत्यूपश्चात १९३१ साली The Great Wall of China (GermanBeim Bau der Chinesischen Mauer) या कथासंग्रहात ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली.
-------------------------------------------------------------------------------------

"हे जग दिवसेंदिवस लहान होत चाललं आहे." दुःखी चेहऱ्याने उंदीर म्हणाला. आधी हे जग किती मोठं होतं, तेव्हा मला खूप भीती वाटायची. मी कायम इकडून-तिकडे धावत असायचो, आणि शेवटी मला  भिंती दिसायला लागल्या, तेव्हा तर मला खुप आनंद झाला होता".
"पण या लांबच लांब भिंतीना  खूपच वेगाने एकमेकींकडे वेगाने ओढल्या जात आहेत ना,  कि क्षणात मी भिंतीच्या शेवटच्या टोकाला पोहचलो पण, जिथे पिंजरा ठेवला आहे आणि मी तिकडे ओढल्या जातो आहे."

"तुला फक्त दिशा बदलायची गरज आहे, बस्स." मांजर म्हणाली आणि त्याला खाऊन टाकलं.



Labels: , , , , , , ,