पंडित आताच तू गेल्याची बातमी वाचली आणी जाणवलं पुण्याशी आपुलकीने नातं असलेला अजून एका कलाकार गेला.
कित्येक चित्रपटातून तू भेटत होतास अगदी विविध रोल्स मध्ये पण तुझं अस्तिव जाणवलं ते 'माचीस' मध्ये त्यातला 'सनातन' तू ज्या दहकतेने रंगवला आहेस त्याला तोड नाही.
'जंगल बुक' मधला 'बघिरा' कोण विसरू शकेल, त्या आवाजातच एवढी जरब होती कि बस्स.....
अगदी कालपरवा तुझा 'मकबूल' पाहिला, त्यात नासिर बरोबरची तुझी जोडी झकासच होती. तुम्ही दोघही FTII च्या एकाच बॅच मधले असल्याने दोघांमधल जे को-ऑर्डिनेशन होतं, ते लाजबाब होतं. त्यातला तुझा 'इन्स्पेक्टर पंडीत' पाहून तुझी चीड हि आली आणि तुझ्या अभिनयाला सलाम हि करावा वाटला.
" शक्ती का संतुलन बना रहना चाहिए संसार में, आग के लिए पानी का दर होना चाहीएँ" या डायलॉग मध्ये आयुष्यातलं केवढ मोठं सत्य अगदी सहजपणे बोलून गेलास.
असो, आयुष्यभर विविधरंगी भूमिकांतून डायलॉग प्रमाणे अभिनयाचं संतुलन राखलं होतंस , ते आता संपलं.
RIP पंडित जिथे असशील तिथे पण असंच शक्ती का संतुलन बनवून ठेव.