'प्रेम कुणावरही करावं' असा म्हणत जेव्हा पहिल्यांदा शाळेत कवितेतून प्रेमाची ओळख झाली तेव्हा फारशी शिंग फुटलेली नव्हती, 'हम अपनी मस्ती मे आग लगे बस्ती मे' हा ऍटिट्यूड घेवून साऱ्या जगाला आग लावायची तयारी करत होतो. नंतर ग्रॅज्युएशनला पुण्यात आल्यावर जेव्हा थोडी अक्कल आली ( मॅच्युरिटी नाही ) तेव्हा बऱ्यापैकी कळलं कि प्रेम वगैरे काय भानगड असते. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती असो...
तर मुद्दा काय आहे कि, बऱ्याच लोकांना आपलं प्रेम व्यक्त करता नाही..इतरवेळी तुफान बडबड करून मित्रांना वैताग देणारे आपला तो/ती दिसली कि त्यांचे जणू शब्दच जातात. यामुळेच कित्येक लव्हस्टोरीज अश्याच न बोलता संपून जातात. तसं पहायला गेलं प्रेम व्यक्त करायला कोणत्याही विशिष्ट दिवसाची गरज नक्कीच नाही.. जसं प्रेम कधीही, कुठेही होऊ शकतं तसंच कधीही कुठेही व्यक्त करता यायलाच हवं. नाहीतर आयुष्याच्या संध्याकाळी 'ती सध्या काय करते ?' हा प्रश्न नक्कीच पडेल. तेव्हा बॉस याही वक्त है , 'Say it' मग ते सिल्क देऊन म्हणा, गुलाब देऊन म्हणा, ग्रिटींग घेवून असुदे किंवा गालिबचा एखादा साधासा शेर असूदेत. मुख्य काय आहे तर प्यार का इजहार करना जरुरी है
Labels: attitude, ijhar, ishq, love, lovestory, maturity, mohabbat, pyar