अल पचिनो

१९७०-७१ ची गोष्ट आहे, ' फ्रान्सिस फोर्ड कपोलो' मारिओ पुझोच्या कादंबरीवर आधारित 'गॉडफादर' बनवत होता. (RGV चा ' सरकार' ज्याची भ्रष्ट नक्कल आहे). जवळपास सगळं पात्रांची निवड झाली होती , राहिला होता फक्त एक पात्र गॉडफादरच्या सर्वात धाकट्या मुलाचं म्हणजेच ' मायकेल कॉर्लीओनी' चं. कपोलो एका नावावर अडून बसला होता, पण निर्माते त्याला मान्यता देत नव्हते , खुद्द त्या अभिनेत्याला सुध्दा आपण मायकलचा रोल नीट निभावू शकू की नाही याबद्दल शंका होती. त्याला 'सोनी कॉर्लिओनी' चा रोल हवा होता. पण कपोलोला विश्वास होता की ती भूमिका कोणी करू शकेल तर फक्त आणि फक्त सिसिलियन वंशाचा असलेला 'अल पचिनो'.
हॉलिवूडच्या सार्वकालिक श्रेष्ठ नटांपैकी एक असलेल्या पचीनोचा जन्म २५ एप्रिल १९४० ला न्यू- यॉर्क मधल्या इटालियन अमेरिकन कुटुंबात झाला. अल पचिनोचं खरं नाव Alfredo James Pacino. अभिनयाची आवड असलेल्या पचिनो ने १९७१ साली ' The panic in niddle park' मध्ये व्यसनाधीन माणसाची भूमिका केली या भूमिकेमुळेच कपोलाचं लक्ष पचिनो कडे गेलं आणि त्याच्या मनात मायकेलच्या रोल साठी तो फिट बसला. कपोलोने त्याला संधी दिली आणि अल पचिनो ने त्या संधीचं सोनं केलं.
नुकताच युद्धवरून येताना गँलेंट्री अवॉर्ड मिळालेला आपल्या वडिलांच्या व्यावसायचा राग करणारा, सर्वात धाकटा पण वेळ येते तेव्हा सर्वात मोठा बनून फॅमिलीला वाचवण्यासाठी निष्ठुर निर्णय घेणारा ' मायकल' अल पचीनो ने खुप सुंदर साकारला आहे. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर संवाद फेकी बरोबर अल पचिनोची नजर जबरदस्त होती. शांतपणे फक्त नजरेच्या धारेने समोरच्याला गारद करण्याचे सामर्थ्य त्यात होते. आठवा कासिनोच्या डील मध्ये मो ग्रीनला नजरेने जरब देणारा सिन. बिझनेस आणि फॅमिली कायम वेगळी ठेवू पाहणारा मायकल जितका क्रूर आहे,
तितकाच "I'm here, Pop , I'll take care of you now. I'm with you now" म्हणत वडिलांच्या बाबतीत हळवा सुद्धा आहे. !!!
असे अनेक उत्कृष्ट सिन पूर्ण गॉडफादर ट्रायोलॉजी मध्ये दिसून येतात. एवढा सुंदर अभिनेता असूनही त्याला फक्त एकच ऑस्कर मिळालाय तो१९९२ साली 'लुकिंग फॉर रिचर्ड' साठी. गॉडफादर नंतर सुद्धा अल पचिनो ने इतर चित्रपट केले, पण त्याने आयुष्यात फक्त गॉडफादर जरी केला असता, तरी त्याचं नाव हॉलिवूड मध्ये अमर झालं असतं.
अश्या या महान अभिनेत्याचा आज ७५ वा वाढदिवस आहे.
Happy Birthday Al Pacino.
: Mandar



Labels: ,