पुतीन : महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान

नुकतंच ' राजहंस' प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं लोकसत्तेचे सुप्रसिद्ध संपादक ' गिरीष कुबेर' यांच 'पुतिन' वाचून संपवलं. तसे त्यांच्या संपादकीय भूमिकेबद्दल वाद असले तरी लेखक म्हणून त्यांचं टाटायन, एका तेेलियाने आणि इतर लिखाण खूप वाचण्याजोगं आहे असो.
पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर त्याच्या नावातच त्याचं सार दडलेला आहे. एखाद्याला रशियाचा बेसिक अभ्यास करायचा असल्यास अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे हे.
पुतिन यांच्या जडणघडणी बद्दल लिहितांना लेखकाने पहिली आठ (8) प्रकरणांत रशियाचा झारशाही पासून ते लेनिन, स्टॅलिन,ख्रुश्चेव्ह,  मिखाईल गोर्बाचेव्ह, बोरिस येल्त्सिन यांसारख्या अध्यक्ष्यांची कारकीर्द, कम्युनिजम चा प्रवास , शीत युद्धाचा धोका इत्यादी गोष्टी विस्तृत पणे उलगडल्या आहेत. याच पार्शवभूमीवर 'व्लादिमीर पुतीन' यांचा झालेला उदय आणि रशियाचा कम्युनिजम पासून ते हुकूमशाही कडे होणारा प्रवास अतीशय रंजकपणे मांडला आहे. पुतिन हे स्वतः कम्युनिजम चे विरोधक पण त्यांनी तसे  न दाखवता हळूहळू तो संपवत हुकूमशाही कडे कसा  नेला हे वाचणे अतिशय उत्कंठावर्धक ठरते. बाह्य जगात पुतीन यांना बॉण्ड समजले जाते पण त्याचे तपशील यात दिले आहे पण अगदी मोजकेच त्यामुळे वाचकांची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे कारण पुस्तक बरंचस फॅक्ट बेस्ड आहे.
एकुणात काय आंतरराष्ट्रीय राजकीय इतिहासाचा वेध घेत  राष्ट्रवादाचा मुलामा देवून व्यक्तिकेंद्रित हुकूमशाही टिकवुन ठेवणाऱ्या एका।जगावेगळ्या व्यक्तिमत्वाची त्याच्या असंख्य भल्याबुर्या कंगोऱ्यांसह करून दिलेली हि ओळख वाचनीय आहे.

Labels: , , , ,