DUNKIRK : Missed by a Whisker

आजच्या युगात सिनेरसिकांना ख्रिस्तोफर नोलान माहीत नसणे अशक्य आहे त्याच्या  Batman, The Dark night, inception, Intresteller सारख्या मुविजनी तमाम चाहत्यांना वेड लावलंय. त्याच नोलान ने यावेळेस जरा वेगळा विषय निवडला होता तो म्हणजे युद्धपटाचा.
दुसऱ्या महायुद्धात प्रसिद्ध असलेल्या डंकर्क च्या यशस्वी माघारीवर ज्यात जवळपास 400,000 सैनिकांना जर्मनीच्या तावडीतून सोडवून जिवंत इंग्लड परत आणले गेले. यात 3 वेगवेगळ्या कथांच एकत्र मिश्रण करून नोलान ने DUNKIRK बनवला. आजघडीला दुसऱ्या महायुद्धावर  कोणताही चित्रपट आला की त्याची तुलना 1998 साली 'स्पिलबर्ग' ने बनवलेल्या 'Saving Private Ryan' सोबत होणे अपरिहार्य आहे इतकी त्याचं दिग्दर्शन , कथाबीज उत्तम आहे. 
दुर्दैवाने उत्तम तंत्रज्ञान, तगडे कलाकार असले तरी तो दुसरा सेविंग प्रायव्हेट रायन होता होता राहिलाय आणि नोलान चा सर्वोकृष्ट चित्रपट तर नाहीच नाही.

डंकर्क मध्ये 3 वेगवेगळ्या कथा आहेत, त्या समांतर फिरत राहतात आणि आपण त्यासोबत प्रवास करत राहतो. शेवटी मुव्ही म्हणजे सिनेमॅटोग्राफी, डंकर्क या आघाडीवर कमालीचा यशस्वी ठरलाय. ' Hoyte Van Hoyetema' चा कॅमेऱ्याने तुफान काम केलंय. विशेषतः बिचवरचे पॅनो शॉट्स, विमानातून दिसणार बीच, रात्रीचं जळणार डंकर्क भारीच. दुसरभाग म्हणजे याचं म्युझिक . या मुवीत म्युझिक खूप महत्वाचा रोल प्ले करतं. यामुळेच अगदी पहिल्या शॉट पासून असणारी गंभीरता शेवटपर्यंत टिकून राहते.

कोणताही युद्धपट जर परिणामकारक व्हायचा असेल तर तो किमान 2.5 ते 3 तास लांबीचा हवाच, तरच त्यात डिटेलिंग मध्ये सगळं दाखवता येतं. इथे डायरेक्टर कमी पडलाय. 3 वेग वेगळे प्लॉट 1.46 तासांत घुसवल्याने सगळं थोडंस आटोपल्यासारखं घेतलंय अस वाटत राहतं. अजून एक जाणवणारी गोष्ट म्हणजे इथे जर्मन म्हणजे शत्रू दृश्य रुपात  कुठेच दिसत नाही.

हे सगळं असलं तरी 'डंकर्क' सध्याच्या घडीला अनुभव घ्यावा असा मुवि आहे, कारण एकच नोलान अण्णा.

जाता जाता : सिनेमा हा अत्यंत प्रभावी प्रपोगांडा म्हणून काम करत आला आहे, जनता आपला तुटणारा विश्वास चित्रपटाच्या माध्यमातून सावरू पाहत असते
सध्याच्या घडीला इंग्लंड फाळणीच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि त्याला सांधण्यासाठी अश्याच एका मूवी ची गरज होती. ती 'डंकर्क' आणि डिसेंबर मध्ये येणारा
'चर्चिल' बहुदा पूर्ण करेल असे दिसते.

Labels: , , , , ,