प्रिय पी. एल.आजोबा,

प्रिय पी. एल.आजोबा,
आज तुमचा वाढदिवस आज तुम्ही असता तर तुमच्या अठ्ठ्याणव्या वाढदिवसाला 'सखाराम गटणे', 'पेस्तनजी', बटाट्याच्या चाळीतील 'सोकाजी त्रिलोकेकर', रत्नांग्रीच्या आळीतील 'अंतुबर्वा', हरितात्या, खास लंडनहुन 'नंदा प्रधान' सारे हजर झाले असते. 'नारायण' नेहमीप्रमाणे घाईत वाढदिवसाची तयारीसाठी माईला मदत करत असता. रावसाहेब 'रूपाली' वर आल्यागेल्यांची सरबराई करण्यात मग्न असते.
रोज सकाळी ऑफीस ला जातांना तुम्ही भेटता आणि आयुष्य कितीतरी सुंदर आहे याची नव्याने जाणीव होते.
'अनंत हस्ते पुरषोत्तमाने देता
किती घेशील दो कराने'
हि उक्ती बहुदा तुमच्यासाठीच जन्माला आली असावी इतकं प्रचंड उपकार तुम्ही आम्हां वाचकांवर करून ठेवले आहेत. उद्या हे जग नसेल, आम्ही नसू पण तुमचे सखाराम गटणे, अंतुबर्वा चिरंतन असतील. बाकी आता स्वर्गात त्या इंद्रयाची सुद्धा हसून हसून मुरकुंडी वळते असं ऐकलंय...
तुम्हांला आजोबा मानत असलेला एक नातू !!!
#Mandar

Labels: , , , , ,