तुम्ही प्राजक्ताचं फुल पाहिलंय कधी, दिसायला अगदी साधं केशरी दांडी, पांढऱ्या पाकळ्या पण अगदी टवटवीत, त्या फुलाचा गंध हि तितकाच सुंदर पण फुल मात्र अल्पायुषी. जरी प्राजक्ताचं आयुष्य कमी असले तरी एकदा का सुगंध तुम्हाला भावला कि तो पूर्ण आयुष्यभर तुम्हांला पुरतो.
शुजित सरकार चा 'ऑक्टोबर' पण तसाच हळूहळू गंध पसरवणारा. हा चित्रपट म्हणजे डॅन(वरुण धवन) आणि शिवली (बनिता संधू) यांच्यातील अव्यक्त संवादासारखा आहे. या चित्रपटाला एक स्वतःची वेगळीच लय आहे, त्यातली प्रत्येक फ्रेम न फ्रेम व्यक्त व्हायला स्वतःचा वेळ घेते. त्यामुळे भरपुर जणांना तो कंटाळवाणा वाटू शकतो पण याच्या सोबत आपल्याला जुळवून घेतलं तर हा पिक्चर पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव ठरू शकतो.
बॅकग्राउंड ला वाजणार शांतनू मोईत्रा चं संगीत हि ऑक्टोबर ची अजून एक सुंदर बाजू आहे असं म्हणावं लागेल.
आपल्या आजूबाजूला सुद्धा अशी भरपूर माणसं असतात जी आपल्या नकळत प्राजक्ता सारखा गंध पसरवत असतात आता हे आपल्यावर अवलंबुन आहे कि आपण त्यांना कितपत ओळखून आपलंसं करतो
मंदार
#October
Labels: movie, October, review, Shujit sircar, varund havan